Crack Collapsed In Anuskura Ghat Due To Rain In Rajapur
महाराष्ट्र रत्नागिरी

अणूस्कुरा घाटात दरड कोसळली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट बंद

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडू लागले आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या अणूस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला आहे. राजापुरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणूस्कूरा घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद […]

महाराष्ट्र रत्नागिरी राजकारण

भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात!

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या […]

Emphasis on empowerment and strengthening of government systems – Guardian Minister Uday Samant
महाराष्ट्र रत्नागिरी राजकारण

शासकीय यंत्रणांच्या सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर – पालकमंत्री उदय सामंत

रायगड(जिमाका)दि.१३ : रायगड जिल्हा प्रशासन गतीमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून […]

Uday Samant
महाराष्ट्र रत्नागिरी

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठी कालमर्यादेत कामे पूर्ण करावी – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी […]

Mahapreet and Konkan Railway will set up cold storage at Ratnagiri
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरी येथे महाप्रित व कोकण रेल्वेमार्फत शीतगृह उभारणार

मुंबई : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे विभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कोकण रेल्वे कार्पोरेशनचे संचालक (संचलन व कमर्शियल) संतोषकुमार झा, मुख्य व्यवस्थापक […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री पाटील यांनी रत्नागिरीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित कामांविषयी आज आढावा घेतला. कोकणाला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ व्हावे अशी मागणी पालकमंत्री उदय […]

Investigation started by SIT in case of attack on journalist in Ratnagiri district
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, नाना पटोले, राजन साळवी, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. […]

Khed Talvat Dam Door Open
क्राईम महाराष्ट्र रत्नागिरी

धक्कादायक! रत्नागिरीत तळवट धरणाच्या दरवाज्याचे अज्ञाताने कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडल, लाखो लीटर पाणी वाया

रत्नागिरी: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते […]

blast in lote midc ratnagiri 10 injured
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरीत MIDC मधील कंपनीत स्फोट, ८-९ कामगार गंभीर जखमी

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेड येथून मोठी बातमी समोर आली आहे. लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीत स्फोट झाला आहे. फेब्रिकेशनचे काम चालू असताना सॉलवंट केमिकलने पेट घेतला. या दुर्घटनेत आठ ते नऊ कामगार गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर आली आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या कामगारांना चिपळूणच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोटे एमआयडीसीमधील डीवाईन […]

Uday Samant
महाराष्ट्र रत्नागिरी

पोलिसांसमोरच उदय सामंत यांना जाळण्याची धमकी, नाना पटोले यांच्या सभेदरम्यान घडली घटना

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन वातावरण तापलं आहे. रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनही पुकारलं होतं. मात्र आता हा वाद चिघळल्याची लक्षणं दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल राजापुरात एक सभा झाली. त्यात रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका […]