रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. धोपावे – चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस एका वळणावर समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. या […]
रत्नागिरी
धक्कादायक खुलासा! माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची पतीनेच केली निर्घृण हत्या, जाळून राख समुद्रात फेकली…
रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींमध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी […]
दापोलीत दोन बसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी, एक बस चालक गंभीर जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज (२५ ऑगस्ट) सकाळी दोन एसटी बसचा भीषण अपघात झाला. दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झाला आहे. एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बोरिवली – दापोली एसटी दापोलीकडे येत असताना […]
रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता
रत्नागिरी : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन ४३० रुग्णखाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रत्नागिरी शहर हे कोकणातील उच्चशिक्षणाचे देखील प्रमुख केंद्र आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असून लोकसंख्या १६.९६ लाख […]
गौण खनिज परवान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन यामधून चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथील चिरेखाण व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणात चिरेखाणीबरोबरच मुरुममाती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी चिरेखाण […]
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारित प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यामध्ये वैद्यकीय सेवा सुविधांचे […]
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरीतील खारेपाटण याठिकाणी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती आहे. कणकवलीतील खारेपाटण चेकपोस्ट येथे […]
रत्नागिरीतील रिक्त जागा लवकरच भरणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टोपे मंत्रालयातून सहभागी झाले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, […]
मोठी बातमी! नारायण राणे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना […]
रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणें यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Narayan Rane’s anticipatory bail rejected by Ratnagiri court #NarayanRane — Prithviraj Maske (@PrithvirajM25) […]









