deepak maratkar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या

पुणे: पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ३६ वर्षीय दीपक विजय मारटकर असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा तो मुलगा होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली आहे. पाच ते […]

कोरोना पुणे महाराष्ट्र

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जादा दर आकारल्यास कारवाई – अजित पवार

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत दिला. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात […]

priya gaikwad
कोरोना पुणे महाराष्ट्र

जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता; जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक

पुणे: माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. माझी मुलगी प्रिया गायकवाड चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड  ही महिला बरी […]

Deputy Chief Minister Ajit Pawar inspects the work of Pune Metro
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

पुणे : अजित पवार आपल्या वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे ओळखले जातात,  अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता पोहोचले त्यांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. यावेळी अजित […]

maratha reservation
पुणे महाराष्ट्र मुंबई

मराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार

कोल्हापुर : आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे […]

fprmer mayor datta ekbote
कोरोना पुणे

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ३१ तारखेला त्यांचा मुलगा रवींद्र एकबोटे याचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता. माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल […]

journalist pandurang raikar
कोरोना पुणे

व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं. पांडुरंग हे टीव्ही ९ मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्री त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती प्रचंड […]

deputy CM ajit pawar
पुणे

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडणार महागात, अजित पवार यांनी दिले कडक कारवाईचे आदेश

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेफीकीरपणे वागणाऱ्या नागरिकांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. ‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन केले पाहिजे. अनेक नागरिक हे मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. तसेच रस्त्यांवर थुंकण्याचेही प्रकार केले […]

Deputy Chief Minister of Maharashtra ajit pawar
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या हटके स्टाईलमुळे पुन्हा एकदा चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसेच आहे, त्यांनी त्यांच्या हटके स्टाईल मध्ये सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांच्या बूमवरच फवारणी केली. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर नेहमी प्रमाणे माध्यमांचे प्रतिनिधी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे आले. मात्र मीडियाशी बोलण्याआधी अजित पवारांनी हातातील सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांच्या बूमवरच फवारणी […]

पुणे

पुणेकरांवरील पाणीसंकट दूर, धरणक्षेत्रात दमदार पाऊस

पुणे शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा या पावसाने दमदार हजेरी लावली आहे, खडकवासला धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे धरणात पाण्याची पातळी चांगली वाढली आहे. परिणामी गणेशोत्सवापर्यंत पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.