fprmer mayor datta ekbote
कोरोना पुणे

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ३१ तारखेला त्यांचा मुलगा रवींद्र एकबोटे याचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २७ जुलैला दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि १८ ऑगस्ट रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुन्हा २२ ऑगस्ट रोजी दत्ता एकबोटे आणि त्यांचा मुलगा रवींद्र यांना त्रास होऊ लागल्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

ससूनमध्ये दत्ता एकबोटे यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते, यावेळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचं निधन झालं. कोरेगाव पार्क येथील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि नातू असा परिवार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत