Deputy Chief Minister of Maharashtra ajit pawar
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या हटके स्टाईलमुळे पुन्हा एकदा चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसेच आहे, त्यांनी त्यांच्या हटके स्टाईल मध्ये सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांच्या बूमवरच फवारणी केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अजित पवार यांनी पुण्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर नेहमी प्रमाणे माध्यमांचे प्रतिनिधी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे आले. मात्र मीडियाशी बोलण्याआधी अजित पवारांनी हातातील सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांच्या बूमवरच फवारणी केली आहे. अजित पवारांनी अचानकपणे केलेल्या फवारणीमुळे उपस्थितांना धक्का देखील बसला आणि हसूही आवरता आले नाही.

अजित पवार म्हणाले कि, कोरोनाच्या काळात आपण गाफील राहून चालणार नाही. जम्बो हॉस्पिटल वेळेत बांधल्याबद्दल त्यांनी पुणे प्रशासकीय यंत्रणेचे आभार देखील मानले. व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजन बेड्स महत्वाचे आहेत. उच्च प्रतीचं हे जम्बो हॉस्पिटल बांधलं गेलंय. कोविड आणि पावसाळ्यातील साथीचे आजार नियंत्रणात आलेच पाहिजे. पुढचे चार महिने आपल्याला अशीच काळजी घ्यावी लागेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत