e pass maharashtra for private vehicles
महाराष्ट्र राजकारण

राज्यात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिलीय. राज्यातील खासगी वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं अनिल देशमुख यांनी या आधी ट्विट करून स्पष्ट केलं. यानंतर अनिल देशमुख यांनी आज ट्विट केलंय.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘मिशन बीगिन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मागर्दशक सूचना यापुढेही कायम राहतील, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. म्हणजेच खासगी वाहनांना यापुढेही राज्यात वाहतुकीसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत खासगी वाहनांना ई-पास बधनकारक असेल.

करोना व्हायरसच्या लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार केंद्र सरकारने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध उठवले आहेत. खासगी वाहनं आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटवल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत