पुणे : पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये आज पहाटे बलात्काराची घटना घडली आहे. आरोपीकडून एका तरुणीची दिशाभूल करून तिला चुकीच्या बसमध्ये बसवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पुण्यात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी २६ वर्षांची असून दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ पथकं तयार केली असून ती आरोपीच्या […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणाबाबत रूपाली चाकणकरांची माहिती, तरूणी मास्क घालून आलेल्या व्यक्तीशी बोलली आणि…
पुणे : पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता ज्या बसमध्ये हा अत्याचार झाला ती बस स्टेशनच्या मध्यभागी उभी असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. आता याप्रकरणावर […]
पालघरमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार, ४५ वर्षीय आरोपीला सुरतमधून अटक
पालघर : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पालघरमधील […]
जांभुळवाडी परिसरात भीषण अपघात, भरधाव दुचाकी विजेच्या खांबाला धडकल्याने दोघांचा मृत्यू
पुणे : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी विजेच्या खांबाला धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जांभुळवाडी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. जांभुळवाडी रस्त्यावर गाथा स्विमिंग पूलजवळ दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या धातूच्या विजेच्या खांबावर […]
भयंकर! २२ दिवसांच्या बाळावर नातेवाईकांकडून अघोरी उपचार, पोटावर दिले गरम विळ्याचे ६५ चटके
अमरावती : उपचार म्हणून तान्ह्याबाळाला चटके दिल्याची संतापजनक घटना अमरावतीतून समोर आली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील ही एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे. बाळाच्या कुटुंबियांनी घरगुती उपाय म्हणून विळा गरम करून त्याच्या पोटावर ६५ वेळा डाग दिले. या उपचाराने बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा होऊन त्याची प्रकृती अधिक बिघडली. सिमोरी गावातील रहिवाशी बेबी […]
पुण्यात खळबळ! स्वारगेट स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार आज (२६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता घडला, जेव्हा पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट स्थानकावर आली होती. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून स्वारगेटवरील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर, आरोपीने बसचा […]
महत्वाचे! पुण्यातील ‘या’ भागांमध्ये २८ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद
पुणे : चंदन नगरच्या पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील तातडीच्या देखभालीचे काम सुरू झाल्याने पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी देखभालीचे काम समान पाणीपुरवठा विभागाकडून केले जाणार आहे. परिणामी, खराडी, चंदन नगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांना संपूर्ण दिवसासाठी पाणीपुरवठा बंद राहील. यामध्ये आनंद […]
कात्रज डेअरीजवळ अपघात : रुग्णवाहिकेच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
पुणे : पुण्यातील कात्रज डेअरीजवळ काल दुपारी एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात पांडुरंग वामन पंधेरे (वय ४८, रा. जांभूळवाडी रोड, दत्तनगर, आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधेरे कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. ही घटना कात्रज ते स्वारगेट मार्गावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. पंधेरे आपली […]
लोकनेते बाळासाहेब थोरात यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर, २ मार्च रोजी सांगलीत डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार
अश्विनी गिते, पुणे : राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील अपार योगदानाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांना “सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील भावे नाट्यमंदिरात आयोजित एक सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा […]
रस्ते व इमारती उपक्षेत्रातील प्रलंबित देयकांसाठी १५ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व इमारती उपक्षेत्राकरिता प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सन 2024- 25 मध्ये आतापर्यंत 15 हजार 91 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच या तरतुदीपैकी फेब्रुवारी 2025 मध्ये विविध घटकांसाठी एकूण 683 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे. प्रलंबित देयके […]










