ACP Smartna Patil described the entire sequence of events at the Swargate bus station
पुणे महाराष्ट्र

कुठे जाताय ताई? आरोपीने तरुणीला विचारलं, एसीपी स्मार्तना पाटील यांनी सांगितला स्वारगेट बस स्थानकातील संपूर्ण घटनाक्रम

पुणे : पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये आज पहाटे बलात्काराची घटना घडली आहे. आरोपीकडून एका तरुणीची दिशाभूल करून तिला चुकीच्या बसमध्ये बसवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पुण्यात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी २६ वर्षांची असून दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ पथकं तयार केली असून ती आरोपीच्या मागावर आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या एसीपी स्मार्तना पाटील यांनी याविषयीचा संपूर्ण घटनाक्रम माध्यमांना सांगितला. त्या म्हणाल्या, ही घटना शिवशाही बसमध्ये घटना घडली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीच्या मागावर आहेत. पीडित मुलगी पुण्यात जॉबला आहे. ती आज पहाटे पुण्यातून फलटणला निघाली होती. सकाळी साडेपाच-सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. तरुणी बसची वाट बघत असताना आरोपी तिच्याजवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला. आरोपीने पीडित तरुणीला ‘कुठे जाताय ताई’, असं विचारलं. ती म्हणाली मला फलटणला जायचं आहे. तेव्हा तो म्हणाला, सातारची बस इथं लागत नाही तिकडे लागलेली आहे. ती म्हणाली बस इथेच लागते म्हणून मी बसलेली आहे. त्यावर आरोपी म्हणाला, नाही तिकडे लागलेली आहे चल तुला घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्यासोबत गेली.

एसीपी स्मार्तना पाटील यांनी पुढे सांगितले कि, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी आरोपीसोबत जाताना दिसून येत आहे. तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार असल्याबाबत तिने विचारणा केली. तर त्यावर आरोपी म्हणाला, ही रात्रीची बस आहे म्हणून प्रवाशी झोपलेले आहेत, तू टॉर्चने चेक करु शकते. त्यानंतर आरोपीने गोड बोलून तरुणीला बसमध्ये चढायला सांगितलं. ती बसमध्ये चढल्यानंतर आरोपीने बसचा दरवाजा लावला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी उतरुन निघून गेला. तरुणी बसमधून उतरली, तिथे दुसऱ्या बसचा ड्रायव्हर दिसत होता. या घटनेनंतर तरुणी पुढे फलटणला जाण्यास निघाली. तिने आपल्या मित्राला फोन करुन घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर मित्राच्या सांगण्यावरुन ती अर्ध्या वाटेवरून परत आली आणि तिने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.

कोण आहे आरोपी दत्तात्रय गाडे ?
शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दत्तात्रय गाडे आहे. हा सराईत गुन्हेगार आहे. याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. धमकी देणं, चेन स्नॅचींग यासारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहेत. दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. गाडे याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गाडे हा मूळचा शिरूरचा आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून दत्ता गाडे याचा शोध सुरु आहे. तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत