महाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस

औरंगाबाद मध्ये मुसळधार पाऊस झाला असून सखल भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्र

पुणे शहरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता

पुणे शहरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता असून, जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं

१) बालवाडी – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाईल . २)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवार या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे व १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर […]

Amit Deshmukh
महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

राज्यातील वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण झाल्यास घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिलेल्या आहेत.

महाराष्ट्र राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही- भाजपा खासदार उदयनराजे भोसले

शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिली. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सांगितलं, व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त शपथ घेतली जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं. शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ […]