उद्या बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली.
या वेबसाईटवर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
अशा प्रकारे बघा निकाल:
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
यानंतर तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येईल. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.




