दूध व्यवसाय करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यात शेतकऱ्यांना खूप खर्च देखील करावा लागतो. पशूंचा चारा, त्यांचे लसीकरण, त्यांच्या आरोग्यविषयक गरजा, त्यांना लागणारी पेंड या सगळ्याचे व्यवस्थापन केल्यानंतर दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
अनलॉक ४ नियमावली (Unlock 4 guidelines) जाहीर, बघा काय सुरू आणि काय बंद
Unlock 4 Guidelines / अनलॉक ४ नियमावली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ४ साठीची नवी नियमावली जाहीर केली आहे. १ सप्टेंबरपासून ही नवी मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत. ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राची परवानगी २१ सप्टेंबरपासून खुल्या […]
लॉकडाऊन मुळे लोकल बंद, डबेवाल्यांना रोजगार नाही
राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका व्यापारी, सर्वसामान्य यांच्यासह डबेवाल्यांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने […]
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडणार महागात, अजित पवार यांनी दिले कडक कारवाईचे आदेश
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेफीकीरपणे वागणाऱ्या नागरिकांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. ‘करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन केले पाहिजे. अनेक नागरिक हे मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. तसेच रस्त्यांवर थुंकण्याचेही प्रकार केले […]
तुकाराम मुंढेंची बदली होताच मनपा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उशीरा येण्यास केली सुरुवात
नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. कडक शिस्तीच्या मुंढेंनी राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवली होती. तसंच, मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक केलं होतं. मिटिंगमध्ये उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ताकीद […]
तुकाराम मुंढेंच्या बदली विरोधात आपचे नागपुरात आंदोलन
ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. आज चार वाजता आम आदमी पार्टीकडून मुंढे यांच्या समर्थनार्थ आणि बदलीच्या विरोधात नागपुरात आंदोलन केले जाणार आहे. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण […]
महाड इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू, तब्बल ४० तासांनी बचावकार्य पूर्ण
महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत कोसळल्याची घटना २४ ऑगस्टला संध्याकाळी घडली. या दुर्घटनेतील मदत व बचावकार्य पूर्ण झाले असून दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, ज्यात पाच पुरुष, तीन महिला आणि एक […]
अनलॉक बाबत राज्य सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण- देवेंद्र फडणवीस
खासगी गाड्यांतून प्रवासासाठी ई पासची अट कायम ठेवण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारला टोला लगावला. “ई पासचं औचित्यच आता संपलंय. लोक मीम्स आणि व्यंग बनवू लागलेत,” असं फडणवीस म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी विधान भवनात मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील अनलॉक बाबत […]
सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदाभाऊ यांनी स्वत: याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांच्या विकासनिधीतून सोमवारी (24 ऑगस्ट) शिराळा तालुक्याच्या आरोग्य विभागास कोव्हिड विलगीकरण कक्षासाठी 20 बेड्स आणि इतर सामग्री देण्यात आली होती.
काँग्रेसला लॉटरी लागली, मात्र त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही- भाजप खासदार सुजय विखे
“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. तसेच तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात, असेही सुजय विखे म्हणाले. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र […]










