mumbai dabbavala
मुंबई

लॉकडाऊन मुळे लोकल बंद, डबेवाल्यांना रोजगार नाही

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका व्यापारी, सर्वसामान्य यांच्यासह डबेवाल्यांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे. त्यामुळे जो पर्यंत लोकल सेवा सुरु होत नाही, तोपर्यंत तरी डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही, असे मत सुभाष तळेकर यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई शहरातील काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. त्यामुळे अनेक चाकरमानी डबेवाल्याला फोन करुन डबे पोहोचण्याबाबत विचारणा करत आहे. पण जोपर्यंत लोकलसेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत डबेवाला कामावर रुजू होऊ शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबईतील लोकल सेवा लवकरात लवकर सुरु करावी किंवा अत्यावश्यक सेवा समजत त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत