Narayan Rane warns CM uddhav thakre
महाराष्ट्र मुंबई

..तर ३९ वर्षांत पाहिलेला इतिहास बाहेर काढेन – नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. राणे कुटुंबीयांना बेडूक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राणेंनी गांडुळाची उपमा दिली. राणे कुटुंबीयांच्या वाटेला जाल तर ३९ वर्षांत पाहिलेला, अनुभवलेला सगळा इतिहास बाहेर काढेन,’ असा इशारा यावेळी राणेंनी दिला. दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे पिता-पुत्रांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी […]

Case filed against a TV actor who runs a sex racket of minors internationally
मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्पवयीन मुलांचे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टीव्ही कलाकाराविरोधात केस दाखल

मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो(CBI)ने मुंबईतील एका टीव्ही कलाकाराविरोधात POCSO आणि IT कायद्यांतर्गत केस दाखल केली आहे. हा टीव्ही कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर सेक्स रॅकेट चालवत होता. आरोपी परदेशातील अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटोज आणि इतर बरंच काही लाच देऊन आणि ब्लॅकमेल करून इन्स्टाग्रामवरून मिळवत होता आणि ते परदेशी ग्राहकांना विकत होता. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी […]

speech of CM was uneducated and motivated by revenge- chandrakant patil
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण हे अभ्यासशून्य व सूड भावनेने प्रेरित, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात विरोधकांवर प्रचंड टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला सविस्तर उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी थेट सवालही विचारला आहे की, ‘बाळासाहेबांच्या नावाने आपण अजून किती दिवस पोळ्या भाजणार आहात?’ चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य […]

Social activist set himself on fire
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपालिकेच्या समोर स्वतःला पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

नगरपालिकेतील ठेकेदाराविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोरच स्वतःला पेटवून घेतले. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भोरे हे सतत तक्रार करत होते. आठ दिवसांपूर्वी एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना […]

Ramdas Athavale
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही – रामदास आठवले

मुंबई : सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. आठवले म्हटले कि, सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, हे सरकार स्वतः पडणार, सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा […]

Ajit Pawar
महाराष्ट्र

ब्रेकिंग : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते काही दिवसांपासून घरीच विलगीकरणात होते. आता त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. कुणीही काळजी करू […]

MNS starts The Fridge of Humanity
महाराष्ट्र मुंबई

कुणीही उपाशी पोटी झोपू नये म्हणून मनसे सुरु करत आहे अनुकरणीय उपक्रम – ‘माणुसकीचा फ्रिज’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ अशा नावाचा एक अनुकरणीय उपक्रम मनसे तर्फे सुरु करण्यात येत आहे. मनसे रिपोर्टने अधिकृतरीत्या ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे कि, मनसेच्या माहीम […]

Preetika Chauhan arrested
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘देवों के देव महादेव’ मालिकेतील अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अटक

मुंबई  : मुंबई पोलिसांनी सापळा रचून टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रीतिका चौहान सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली […]

TRP scam
महाराष्ट्र मुंबई

गुन्हे शाखेला मोठे यश, टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडे याला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक के ली. घोटाळ्यात सहभागी सर्वच वाहिन्यांसाठी अभिषेक याने गुन्हे, अवैध कामे के ल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिषेकने वकिलामार्फत रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर […]

Rape of a minor girl in Panvel
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : गुरे चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पालघर: मनोर येथील गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. […]