जळगाव : जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी सीडी लावण्याचा इशारा दिला आहे. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळली, रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक बोलले…
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पूजा चव्हाण […]
पंढरपूर जवळ बोलेरोचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात […]
आनंदाची बातमी : तात्काळ मदतीसाठी पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस ही नवी यंत्रणा.. १०० नंबर कालबाह्य…
पुणे : राज्यात ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली […]
गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..
पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठीच्या गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी
मुंबई : शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गामुळे १९ फेब्रुवारी २०२१ रोजीचा ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठीच्या गाईडलाईन्स : अनेक […]
उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणासाठी घेतली शरद पवार यांची भेट
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज(११ फेब्रुवारी) शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं. यावेळी उदयनराजे म्हणाले, “शरद पवार यांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढं गांभिर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात […]
येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो, संजय राऊत यांनी दिलं देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर
राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सर्व आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना […]
आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपालांना परवानगी नाकारल्याने उमटल्या प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरुन परत राजभवनावर यावं लागलं. मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारली, विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावं लागलं देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया : देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं कि, “हा […]










