pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode
पुणे महाराष्ट्र

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण : बनसोडे यांच्या मुलासह 21 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप […]

pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode
पुणे महाराष्ट्र

आमदार बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण, पोलिसांनी दिली खळबळजनक माहिती

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या कथित गोळीबार प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या कंत्राटदार अँथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवारने जीव वाचवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचा जबाब दिला आहे. आमदार अण्णा बनसोडेंनी दावा केला होता की तानाजी पवारने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांना गोळी […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. त्यातच आगामी चार-पाच महिन्यात कोरोना-19 विषाणू […]

Ncp Opposes Lockdown In Maharashtra
महाराष्ट्र

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते […]

pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode
क्राईम पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत कोणीही […]

Gurmeet Choudhary
कोरोना नागपूर महाराष्ट्र

अभिनेता गुरमीत चौधरीची स्तुत्य कामगिरी, अवघ्या १६ दिवसांत उभारले हजार बेड्सचे कोविड हॉस्पिटल

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी सरकारच्या मदतीसाठी काही समाजसेवी संस्था, काही नागरिक तसेच मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारही गरजू लोकांना मदत करत आहेत. आता अभिनेता गुरमीत चौधरीही कोरोना पेशंटसाठी काम करत आहे. त्याने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये ‘आस्था’ नावाने कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी गुरमीतने लखनऊ, […]

maharashtra govt book order in haffkine institute for 1 lakh mucormycosis injections
महाराष्ट्र मुंबई

राज्यात म्युकरमायकोसीस या प्राणघातक आजाराचा फैलाव सुरु, राज्य सरकारने सजग होत घेतला मोठा निर्णय..

मुंबई : राज्यात प्राणघातक म्युकरमायकोसीस आजाराचा फैलाव सुरु झाला आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सजग भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती […]

ED registered fir against former home minister Anil Deshmukh
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयनंतर आता ईडीनेही दाखल केला गुन्हा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून देखील त्यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट […]

Strict lockdown in Nashik district from tomorrow
कोरोना नाशिक महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, काय सुरु आणि काय बंद राहणार, जाणून घ्या..

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे या कालावधीत १२ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. किराणा माल, दूध, बेकरी आणि मिठाई दुकाने ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यातून औषध, […]

Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar
कोरोना नाशिक महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेने लढवय्या नेत्या गमावल्या; नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. […]