मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहात गोंधळ घालत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय कुटे या माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे निधन, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे आज (५ जुलै) निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या निधनाची माहिती दिली. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार […]
31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, अजित पवार यांनी केली मोठी घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यांनी यावेळी स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी घटना असल्याचं म्हटलं. तसेच राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन दिल आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका […]
‘यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे’… भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्वीट चर्चेत
मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या अगोदर पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्वीट करत उद्धव ठाकरेंची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी केली आहे. भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे कि, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या
मुंबई : पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे थोड्या कालावधीत होणारा प्रचंड पाऊस लक्षात घेता सखल […]
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२१ : प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी
१. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेल्या नसल्यामुळे बरेच सभासद अक्रियाशील होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठीमहाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2021 आणण्यात आले आहे. (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) २. इनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व रोख वसूल केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम कमी […]
दुःखद : म्युकरमाकोसिसमुळे डोळा गमावलेल्या पोलिसाची आत्महत्या..
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 46 वर्षीय प्रमोद यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. प्रमोद यांना म्युकरमायकोसिस आजार झाला होता. यामध्ये त्यांनी आपला डोळाही गमावला होता. […]
शेतकऱ्यांनी पेरणीचे सुक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी […]
राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन मुलांना ‘डिजिटल स्मार्ट स्टीक्स’ प्रदान
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ दृष्टिहीन मुलांना विनाअडथळा चालण्यासाठी डिजिटल स्मार्ट स्टिक्स प्रदान करण्यात आल्या. राजभवन येथे शनिवारी (दि. ३) झालेल्या एका कार्यक्रमात वैष्णव संप्रदायाचे आचार्य गोस्वामी व्रज्रकुमारजी महाराज यांच्या उपस्थितीत मुलांना सेन्सर असलेल्या स्मार्ट स्टीक्स देण्यात आल्या. वल्लभ युथ ऑर्गनायझेशन, विश्व सिंधी सेवा संघम, लायन्स क्लब इंटरनॅशनल व नयन फाउंडेशन […]
अनिल देशमुख यांच्या मुलाचीही होणार ईडीकडून चौकशी
मुंबई : ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे केली जात आहेत. अशातच आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि […]










