पुणे : राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल, 11 जणांना अटक
मुंबई : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर 26 जून ते 9 जुलै या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून […]
महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, तर ‘या’ पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून रायगड आणि पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, […]
प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन […]
पंढरपुरात पुन्हा भक्तिसागर भरु दे, जनतेला आरोग्य लाभू दे, मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाच्या चरणी साकडे
पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशी महापूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा […]
ठाण्यात घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना, ३ मुलांसह 5 जणांचा मृत्यू
ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या […]
प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थ्यांसाठी 2021 -22 या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया
मुंबई : शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणकेंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रौढ मूकबधिर प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी १० ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अधीक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत […]
हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, पुढील काही तास महत्वाचे
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार […]
मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला
मुंबई : तीन जणांनी भररस्त्यात एका वकिलावर काठ्या आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी भररस्त्यात या वकिलावर तलवारीने वार केले. तसेच काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वकिल सत्यदेव जोशी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (१८ जुलै) दुपारी घडली […]
मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यातच आता कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. गोवा-करमली येथील बोगद्यात दरड कोसळली असून सकाळपासून कर्नाटक-केरळमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर […]










