नाशिक : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले कि, ‘श्रीजी’ हाेम या प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी आहे. मात्र, ही कंपनी नोंदणीकृत नाही. त्यामुळे या कंपनीची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आमदारांचा घाेडेबाजार सुरु असल्याची […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
कार दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना, कोल्हापूरातील 2 तरुण जागीच ठार, 2 जखमी
कोल्हापूर : कार २५ फूट खोल दरीमध्ये कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोल्हापूरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय […]
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, येरवडा परिसरात सुमारे 7 लाख 88 हजाराचे अंमली पदार्थ जप्त
पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका गुन्हेगाराकुडन 7,88,350 रुपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ३ जून रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे स्टाफसह येरवडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना येरवडा येथील पर्णकुटी पायथा दरबार बेकरी […]
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये […]
भरधाव कारची ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक, एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली…
हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावरील दिग्रस फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हिंगोलीकडून औंढा नागनाथच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला, मात्र कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील चौघे सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, बोरजा येथील ट्रॅक्टरचालक […]
काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू […]
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार’ संकल्पना, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले ‘हे’ निर्देश
औरंगाबाद : पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रॅगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना व्हावी, महिला दक्षता समित्यांच्या […]
उद्योजकांनी कामगारांच्या आर्थिक अडचणींना विचार करुन सर्वमान्य तोडगा काढावा
नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन त्यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविड काळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरुन दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज केले. विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील […]
कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, ७ जूनला मुंबईत शेतकऱ्यांची बैठक
शिर्डी : अहमदनगरमधील शिर्डी तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली. किसान क्रांतीच्या कोअर कमिटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर १५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून २०२२ रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात […]
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अनेक आदेश दिले आहेत. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या बंद सार्वजनिक […]










