मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेत भर टाकायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 4024 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 3028 रुग्ण बरे झाले आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय प्रकरणे […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन […]
देहूमध्ये अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, प्रवीण दरेकरांनी केली ‘ही’ विनंती
पुणे : देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, अजित […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या धर्मग्रंथात मानव जन्मातील दुर्लभ संतांचा सत्संग असल्याचे सांगितले आहे. संतांची कृपा झाली तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज या पवित्र तीर्थक्षेत्र देहूवर येताना मलाही तेच वाटत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देहूचे शिला मंदिर हे केवळ […]
राज्यात मेमध्ये २१ हजार ५५६ युवकांना रोजगार, नोकरीइच्छूक उमेदवारांना राजेश टोपे यांनी केलं ‘हे’ आवाहन
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२ मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध […]
औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत अमित देशमुख यांनी घेतला आढावा
औरंगाबाद : औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हसेकर, जे. एम. सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण
मुंबई : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१0 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री […]
संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, राज्यसभा निवडणुकीदरम्यान भ्रष्ट कारभाराचे आरोप
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. किरीट सोमय्या यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, नुकत्याच झालेल्या राज्यसभा […]
शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू […]
पुणे : पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून मेहुण्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून एकाने त्याच्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव राहुल माने (वय 25) असून त्याने सिध्दार्थ काटकर (वय 20) याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मिळालेल्या […]










