मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन […]
मुंबई
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार […]
राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : ‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित, बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत आहे. ‘नॅब’ संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन […]
पत्नीला मुल जन्माला घालण्याची सक्ती करू शकत नाही, ‘ते’ स्त्रीचे वैयक्तिक स्वातंत्र्य- मुंबई उच्च न्यायालय
मुंबई : पतीच्या संमतीशिवाय गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या महिलेच्या निर्णयाला हिंदू विवाह कायद्यांतर्गत क्रूरता म्हणता येईल का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच उपस्थित केला होता. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि उर्मिला जोशी-फाळके यांनी अधोरेखित केले की स्त्रीला “मुलाला जन्म देण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.” न्यायालयाने निरीक्षण नोंदवले कि, “अपीलकर्त्याचा/पतीचा मुद्दा जसा आहे तसा स्वीकारला गेला […]
मुंबई उपनगर परिसरात लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार
मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात अर्जदार पूनम नायर यांनी लहान मुलांना […]
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय कार्यशाळेत […]
वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, अपघात कॅमेऱ्यात कैद
मुंबई : मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना […]
अनिल देशमुख यांना जामीन मिळूनही तुरुंगातच राहावे लागणार, कारण…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला, असे असूनही त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आणि 100 कोटी वसुलीचे आरोप असल्यामुळे अनिल देशमुख अटकेत आहेत. ईडी आणि […]
ब्रेकिंग! अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एनजे जमादार यांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजता हा आदेश दिला. देशमुख यांना मात्र आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे, कारण त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय […]










