मुंबई : दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘एक मराठमोळी तरूणी जगभ्रमंतीचे साहस करणार आहे, तिची ही जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रोत्साहन ठरेल’अशा शब्दांत त्यांचे कौतुकही केले. वर्षा शासकीय निवासस्थानी श्रीमती रमिला यांनी भेट घेऊन, मुख्यमंत्र्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली. श्रीमती लटपटे या चिंचवड (पुणे) येथील आहेत. […]
मुंबई
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजअखेर 3 अर्ज दाखल
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि […]
अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्त्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अशावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. दिंडोशीनगर, गोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या […]
जर्मनीचे नवे वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी घेतली राज्यपालांची भेट, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा
मुंबई : जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. फेबिग म्हणाले, जर्मनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक असून उत्पादन, स्वयंचलित वाहन व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीत आज अंदाजे ३५ हजार भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून अलिकडे हे प्रमाण सातत्याने […]
मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, SC चा जामीन आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार
मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला विरोध करत ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार […]
महिला बचतगटांच्या उत्पादनांचा 11 व 12 रोजी दीपावली मेळावा
मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, […]
अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक : 14 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
मुंबई : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर असल्याची माहिती, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 3 ऑक्टोबर 2022 पासून या […]
दिव्यांगांसाठी एक खिडकी योजना सुरू करणार- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. बोरविली पश्चिम येथील आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री […]
संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागातील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने 1 ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना अटक केली […]
रश्मी शुक्लांना महाराष्ट्रात परत आणण्याच्या हालचालीना वेग, महत्त्वाच्या पदावरही वर्णीही लागणार?
मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे आता रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात फक्त परत आणले जाणार आहे तसेच त्यांची वरिष्ठ पदावर वर्णीही लागले अशी जोरदार चर्चा सुरु आहे. या संभाव्य निर्णयाबद्दल राज्यातील पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट […]









