NEW GERMAN CONSUL GENERAL CALLS ON GOVERNOR KOSHYARI; DISCUSSES ENHANCING EDUCATIONAL COOPERATION
महाराष्ट्र मुंबई

जर्मनीचे नवे वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी घेतली राज्यपालांची भेट, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा

मुंबई : जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फेबिग यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फेबिग म्हणाले, जर्मनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक असून उत्पादन, स्वयंचलित वाहन व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीत आज अंदाजे ३५ हजार भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून अलिकडे हे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनी भारतासोबत हरित ऊर्जा, मेट्रो रेल, जलव्यवस्थापन आदी क्षेत्रात सहकार्य करीत असून भारताशी सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.

राज्यातील विद्यापीठे व जर्मनीतील शिक्षण संस्थांमध्ये सहकार्य वाढविल्यास आपण कुलपती या नात्याने निश्चितच मदत करू असे राज्यपालांनी सांगितले. जर्मनीतील विद्यार्थ्यांनी राज्यातील विद्यापीठांना भेट द्यावी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील जर्मनीच्या शिक्षण संस्थांना भेट द्यावी तसेच उभयपक्षी संस्कृती, शिक्षण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत