Bandra-Worli Sea Link Accident
महाराष्ट्र मुंबई

वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, अपघात कॅमेऱ्यात कैद

मुंबई : मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चार वाहनं आणि रुग्णवाहिकमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी नायर, सैफी, लिलावती ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना उपचार करून घरी पाठवण्यात आले असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत वेगाने येणारी कार रुग्णवाहिकेला धडक देत असल्याचं दिसत आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत