माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह 3 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला आहे. परिक्षा देऊन या तिन्ही विद्यार्थिनी घरी चाललेल्या होत्या. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाट मार्गावर चोळई गावच्या वळणावर हा अपघात घडला. वाळूने भरलेला डंपर अचानक […]
मुंबई
कपूर कुटुंबात आली नन्ही परी, आलियाने दिला मुलीला जन्म
मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतलाय. आलिया भट्टने तिच्या संपूर्ण गरोदरपणात काम केले आहे. यादरम्यान आलिया अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत तिने चक्क चित्रपटाचे प्रमोशन देखील केले. गरोदरपणात आलिया सतत काम करताना दिसली. ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी आलिया सतत फिरत होती. आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर […]
नवाब मलिकांना मोठा दणका! संपत्ती जप्त करण्यास ईडीला मिळाली परवानगी
मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांची काही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याची परवानगी विशेष पीएमएलए न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली आहे. मलिक यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असलेले नवाब मलिक यांच्यावर कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमधील फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर […]
राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन
मुंबई : 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक […]
अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमात नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचे मतदान
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या ‘घरून मतदान’ या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी घरून मतदान करून आपले लोकशाहीविषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी […]
छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई : सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे. भारत […]
मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्राला समृद्ध करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : महाराष्ट्रातील रंगभूमी व चित्रपट सृष्टीची भरभराट करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व सह कलाकारांचा सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी आज सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते आणि कवि किशोर कदम, निर्माते अक्षय बर्दापूरकर, […]
सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या काही पदांचे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंडळाच्या शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. उर्वरीत पदांसाठी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह (बंदरे व परिवहन) विभागाची सेवा प्रवेश नियम-विनियम करण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी मंत्री भुसे बोलत […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेबाबत मंत्रिमंडळ उप समिती स्थापन ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन […]
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. […]








