महाराष्ट्र मुंबई

उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार

महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान मुंबई : उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील सिडकुल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. […]

Appreciation to 'Sea Cadets' from the Governor
महाराष्ट्र मुंबई

‘सी कॅडेट्स’ना राज्यपालांकडून कौतुकाची थाप

मुंबई : देशभक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक असलेल्या सी कॅडेट कोअरच्या युवा कॅडेट्सच्या ५० जणांच्या एका चमूने शनिवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी सी कॅडेट कोअरच्या कार्याची माहिती करून घेतली व कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली. सुरुवातीला सी कॅडेट कोअरचा स्थापनेपासूनच इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे […]

Actress deepali sayyad will enter in shiv sena eknath shinde group
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न अयशस्वी, ठाकरेंनी दोन पावलं मागे यायला हवं होतं – दीपाली सय्यद

मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देत ठाकरे गटाच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिलीय. दीपाली सय्यद उद्या दुपारी एक वाजता ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी एक वृत्तवहिनीला प्रतिक्रिया देताने म्हणाल्या कि, […]

Remove encroachment in open ground in Santacruz East – Guardian Minister Mangal Prabhat Lodha
महाराष्ट्र मुंबई

सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. सांताक्रुझ पूर्व येथील एच ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार पराग अळवनी तसेच […]

Seizure of misprinted low quality food stock under special drive on food security
महाराष्ट्र मुंबई

अन्न सुरक्षा विशेष मोहीमेंतर्गत गैरछाप असलेला कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त

मुंबई : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्जस्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज आणि […]

Shiv Sena leader Sanjay Raut gets bail in Patra Chawl land scam
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! अखेर शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर… पण ईडी उच्च न्यायालयात जाणार

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे […]

There will be two separate online centers for the competition for theater organizations working across Maharashtra and the country
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र आणि देश यापलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या नाट्यसंस्थांसाठी स्पर्धेची दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्र होणार

मुंबई : महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील,अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव […]

Tax evasion should be prevented through advanced technology – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशात जीएसटी संकलनात राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. वस्तू व सेवा कर विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही करचुकवेगिरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू व सेवा कर विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य मनोज […]

har har mahadev show stopped ncp 100 workers filed a case in the police station
क्राईम महाराष्ट्र मुंबई

हर हर महादेव शो बंद पाडला, प्रेक्षकाला मारहाण, आव्हाडांच्या १०० समर्थकांवर गुन्हे दाखल

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी आता 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. हरहर महादेव सिनेमामावरून राष्ट्रवादीचे आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी प्रेक्षकांना […]