Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली; अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. […]

Commission to support women in court battle – State Women's Commission Chairperson Rupali Chakankar
महाराष्ट्र मुंबई

महिलांना न्यायालयीन लढाईत आयोग देणार साथ – राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार्या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. […]

MoU for employment of 1 lakh 21 thousand youth in industries; corporate organizations
महाराष्ट्र मुंबई

1 लाख 21 हजार युवक-युवतींना उद्योग, कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आज राज्यातील ४४ नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील 1 लाख 21 हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात […]

Balasaheb Thackeray's National Memorial Inspiring People; The first phase of the monument will be completed by March 2023
महाराष्ट्र मुंबई

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक जनतेला प्रेरणादायी; स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. […]

Taxi and auto base fares in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन

मुंबई : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5 किलोमीटरसाठी […]

BJP leader Radhakrishna Vikhe Patil
महाराष्ट्र मुंबई

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून 10 हजार कोटी मिळणार – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यातील ग्रामीण कुटुंबियांना नियमितपणे रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) ही एक केंद्र शासनाची वित्तीय संस्था असून यांच्याकडून राज्याला १० हजार कोटी रूपये मिळणार आहेत. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळांनी रोजगार निर्मितीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री […]

Inauguration of businesses of beneficiary entrepreneurs by Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत […]

Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई

नवाब मालिकांच्या अडचणीत वाढ! समीर वानखेडेंवरील आरोपांप्रकरणी न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

मुंबई : महाराष्ट्रातील वाशिम येथील सत्र न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (एससी/एसटी कायदा) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबत आरोप केल्याप्रकरणी पोलिस तपासाचे निर्देश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एम. देशपांडे यांनी सांगितले की, तक्रारीतील आरोप आणि रेकॉर्डवरील कागदपत्रे यावरून दखलपात्र गुन्हा उघड झाला […]

Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी माहिती, सीआयडीकडून मेटेंच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत असून सीआयडीकडून रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सीआयडी […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

लोकहिताला शासनाचे प्राधान्य, शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहोचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताला आम्ही प्राधान्य देत आहोत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘साम मराठी’ वृत्त वाहिनीतर्फे आयोजित सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा- मंथन विकासाचे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “राज्याचा […]