मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देत ठाकरे गटाच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिलीय. दीपाली सय्यद उद्या दुपारी एक वाजता ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
दीपाली सय्यद यांनी एक वृत्तवहिनीला प्रतिक्रिया देताने म्हणाल्या कि, मला ठाण्यात निवडणूक लढवण्याची संधी मिळेल का याबाबत आणि सर्व प्रश्नांवर मी उद्या सविस्तर भूमिका मांडेन. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. मी शिवसेनेतच शिंदेंबरोबर आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. उद्धव ठाकरेंनी दोन पावलं मागे यायला हवं होतं. ते मागे आले असते तर काहीतरी झालं असतं. पण ते मागे आले नाहीत. देव करो आणि भविष्यात तरी ते एकत्र येवो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तसेच पुढे बोलताने त्या म्हंटल्या कि, मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यांनी एकत्र यावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय. पण गोष्टी आता इतक्या पुढे गेल्या आहेत की काही सांगता येणार नाही. प्रत्येकाला काम करायचं आहे. त्यापद्धतीने प्रत्येकजण चाललेलं आहे. तसंच आहे. काय होतं ते पाहुयात अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली.