मुंबई : राज्यातील महाविद्यालये उद्या (15 फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली आहे. स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय देईल, असं शासन निर्णयात सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा […]
मुंबई
ब्रेकिंग : विक्रोळीजवळ 1800 किलो गांजा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मुंबईत काहीजण गांजा पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती. घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवली. अडवलेल्या ट्रकमध्ये नारळ भरलेले होते. आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली होती, त्यात त्यांनी […]
धक्कादायक : आईचं निधन, वडील सोडून गेले, 8 महिन्याच्या निरागस चिमुरडीची विक्री… पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड..
विरार : आईचं निधन, वडील सोडून गेले, निरागस चिमुरडीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरार पोलिसांनी सापळा रचुन मुलीची सुखरूप सुटका केली आहे व आरोपींना बेडया ठोकल्या. मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. मिळाली माहिती अशी कि, कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत […]
वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, ४ जण जखमी
मुंबई : वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील सिलेंडरच्या गोदामालाच आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सिलेंडरच्या गोदामालाच आग लागल्यानं परिसरात […]
मंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का…
मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांच्या नियुक्तीविषयी कायद्याचे उल्लंघन करत काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. पाच नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ एका नगरसेवकाच्या नियुक्तीविषयी आक्षेप असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वच नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे मंत्र्यांचा ७ डिसेंबर २०२० चा स्थगिती आदेश हा उघडपणे बेकायदा आहे’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई […]
ब्रेकिंग : तळोजा एमआयडीसीत आगीने घेतलं रौद्ररूप, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरली आग
मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. ह्या आगीची भीषणता वाढली असून बाजूच्या दोन कंपन्यादेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. आग रौद्ररूप घेत असून परिसरात घबराट पसरली आहे. सध्या अग्निशमन दलाची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत फार्मा कंपन्यांना लागणारं सॉल्व्हन्ट ऑइल तयार होत असल्याची माहिती आहे. […]
तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग
मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील एका केमिकल फॅक्टरीत आज (९ फेब्रुवारी) भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच दहा अग्निशमन गाड्या हजार झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तळोजा अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कि, त्यांना सकाळी 11.51 वाजेच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत असलेल्या एझिओक्रिस्ट ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडला (Azeocryst Organics private limited) आग लागल्याची माहिती मिळाली. […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याविरोधात तक्रार… चौकशीची मागणी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबतची माहिती लपवली. प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी केली असता ती पूर्णसत्य नाही, याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाकडे सोमवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे. त्यांनी दडवलेल्या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली […]
धक्कादायक : प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवलं, पेट घेताच तिने त्याला मिठी मारली, आणि..
मुंबई : जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. पेट घेताच तिने प्रियकराला मिठी मारली. यात गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर प्रियकराचा मृत्यू झाला आहे. मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांधी नगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना […]
मुंबई लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई महापालिकेने दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील […]










