मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अंमलबजावणी संचालनालय आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करणार आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राऊत यांचा कॉलम रविवारी सामनामध्ये छापून आला. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगातूनच ते लिहिलंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणानंतर आता ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या […]
मुंबई
गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार […]
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार, दोघांना समोरासमोर बसवून चौकशीची शक्यता
मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आज ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहारानंतर हे समन्स जारी करण्यात आले होते. ईडीचे अधिकारी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून दोघांची चौकशी करू शकतात. गुरुवारी न्यायालयात न्यायाधीश देशपांडे यांनी राऊत यांना काही अडचण आहे […]
‘मदत नको तर समाजाकडून सहकार्य हवे’ हा दिव्यांगांचा विचार सकारात्मक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. राज्यपालांनी सर्व दिव्यांग महिलांना शुभेच्छा देताना स्वतःच्या वतीने ओवाळणी भेट दिली. आज नेत्रहीन व्यक्ती यशस्वी उद्योजक, क्रीडापटू तसेच इतरही क्षेत्रात अग्रणी राहून आत्मनिर्भर झाल्याचे पाहायला मिळते असे राज्यपालांनी […]
महाराष्ट्र शासन कर्जरोख्यांची परतफेड 5 सप्टेंबर रोजी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.91 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र.एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.31 ऑगस्ट,2012 अनुसार 8.91 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि.4 सप्टेंबर 2022 पर्यंत […]
मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये भीषण आग
मुंबई : मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली. नागरी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील बंद बालरोग ओटीमध्ये आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही […]
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स, उद्या सकाळी होणार चौकशी
मुंबई : ईडीने पत्रा चाळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासातील कथित आर्थिक अनियमितता आणि पत्नीच्या मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहारांप्रकरणी ईडीने राऊत यांना रविवारी अटक केली. संजय राऊत यांना आज मुंबईतील न्यायालयात […]
संजय राऊत यांचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला, ईडीने उल्लेखनीय तपास केल्याचे नमूद
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने हा आदेश दिला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की ईडीने तपासात “उल्लेखनीय प्रगती” केली आहे. उपनगरीय गोरेगावमधील पत्रा चाळ (जुन्या पंक्ती सदनिका) च्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता आणि संजय राऊत यांची पत्नी आणि कथित सहकारी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व प्रशासकीय बैठका रद्द
मुंबई : सततचे दौरे आणि सभा यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, बैठका, भाषणं, […]
शिवसेना पक्षचिन्हाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ आदेश, 8 ऑगस्टला पुढील सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आजची सुनावणी सोमवारपर्यंत ढकलली आहे. निवडणूक आयोगाकडूनही याप्रकरणी बाजू मांडण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. […]









