Fire
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये भीषण आग

मुंबई : मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली. नागरी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील बंद बालरोग ओटीमध्ये आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर आहे. त्याच भागात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग नेमकी कशी लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीची लोळ व धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत