मुंबई : मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली. नागरी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील बंद बालरोग ओटीमध्ये आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही […]

