मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या मागण्यासंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डबलडेकर इलेक्ट्रिक […]
मुंबई
मुंबई : बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली, पहा व्हिडीओ
मुंबई : मुंबईतील बोरिवली येथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगरमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन रेस्क्यू व्हॅन आणि तीन ऍम्ब्युलन्स आधीच घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बोरिवली परिसरातील […]
समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे तक्रार दाखल
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप आहे. ‘अमन’ नावाच्या एका ट्विटर हँडलवरून 14 ऑगस्ट रोजी समीर वानखेडे यांना मेसेज मिळाला. यात त्या व्यक्तीने लिहिले, “तुमको पता है तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा (तुम्ही काय केले हे तुम्हाला माहिती आहे, […]
बक्करवाडी येथे अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची विशेष पथकामार्फत होणार चौकशी
मुंबई : बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य लक्ष्मण पवार, डॉ भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बक्करवाडी प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य सुनील प्रभू आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाचे सर्व काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ […]
जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. मात्र काही ठिकाणी वर्ग खोल्यांची बांधणी आणि दुरुस्ती […]
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण […]
वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या आहेत. त्या हिताच्याच आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आले त्यावर सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, नाना पटोले व रवींद्र वायकर यांनी सूचना मांडल्या. त्यावर उत्तर देताना […]
आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासन ठोस पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील घटनेबाबतचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नवजात जुळ्या बालकांचा […]
दहीहंडीला आता खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : दहीहंडीला आता खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याशिवाय उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात, अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]









