रायगड : रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. बोटीमध्ये शस्त्रे सापडल्याचे वृत्त आहे. एका मच्छिमाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्याचवेळी बोटीत शस्त्रे सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल […]
मुंबई
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, राऊतांकडे असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावे
मुंबई : ईडीने बुधवारी मुंबई उपनगर परिसरात छापे टाकले. मुलुंडच्या एका कार्यालयावर छापा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणात दस्तावेज जप्त करण्यात आले. यात संजय राऊत वापरत असलेल्या 2 महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने घेण्यात आल्या असल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे. संजय राऊत आणि श्रद्धा डेव्हलपर्स […]
मुंबई पोलिसांनी तब्बल 2,435 कोटी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त, 7 आरोपींना अटक
मुंबई : मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात कारवाई सुरूच असून अँटी नार्कोटिक्स सेलने छापा टाकून 2,435 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. हे संपूर्ण प्रकरण याच वर्षी २९ मार्चचे आहे, जेव्हा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील गोवंडी भागात […]
विनायक मेटे यांच्या अपघाताची CID चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाच वेळा विधानपरिषद आमदार राहिलेले विनायक मेटे भाजपसोबत युतीमध्ये होते. विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं. दरम्यान, मेटे यांची […]
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल, त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च […]
गोविंदांना आता शासनाकडून 10 लाखाचे विमा संरक्षण
मुंबई : गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी होती, या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी […]
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत, 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री […]
लता दीदींच्या जयंतीदिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च […]
अल्पवयीन मुलीवर भावानेच केला बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर मुलीचे प्रियकरावर आरोप… अखेर अशाप्रकारे सत्य समोर
मुंबई : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची आई पीडीतेला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन आली असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सत्र न्यायालयात आणि बाल न्याय मंडळासमोर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या मित्राला अटक केली होती. मात्र, डीएनए चाचणीत वेगळेच […]
दुर्गम भागातील व्यथा! गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू
पालघर : एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी झोळीतून तीन किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात […]










