Somnath Gite awarded doctorate from Vishwakarma University
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र

विश्वकर्मा विद्यापीठाकडून सोमनाथ गिते यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

पुणे : विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून श्री. सोमनाथ निवृत्ती गिते यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी (Doctorate in de-addiction study and innovation) प्रदान करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीचा सखोल अभ्यास करून त्यावर नवनवीन उपाय शोधण्याचे काम त्यांनी केले, अनेकांचे समुपदेशन केले, तसेच सातत्याने लिखाण करून उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल त्यांना या उच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे. गेल्या […]

mns chief raj thakre
अहिल्यानगर महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांवर धडकल्याचे समजते. दोन गाड्यांच्या बोनेटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव (ता. नेवासा) येथे ही घटना घडली आहे. यात दिग्दर्शक केदार […]

Mumbai High Court
अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी पुढील शिक्षण घेणार, मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी

मुंबई : 2017 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या दोन कैद्यांना मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगवासात मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि एस. एम. मोडक यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना कोठडीत असताना शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दोषींच्या विनंतीला मान्यता देण्याचे आवाहन केले. न्यायालयाने म्हटले कि, “आम्ही पुढे असे […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र

पुण्यासह नगरमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता…

पुणे : पुढील 3 ते 4 तासांत पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाच्या […]

double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
अहिल्यानगर क्राईम महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये भयंकर घटना! अगोदर पत्नीला डोक्यात कुदळ घातली, नंतर मुलाला झाडाला लटकवून फाशी दिली…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने किरकोळ वादातून अगोदर पत्नीच्या डोक्यात कुदळ घालून तिला मारून टाकले, नंतर मुलाला झाडाला फासावर लटकावून त्याचीही हत्या केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोपीने हत्या केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या […]

The unfortunate death of a sister-brother who went fishing in nagpur
अहिल्यानगर महाराष्ट्र

दुःखद! मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अहमदनगर : मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. केतन शशिकांत लोंढे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (गणेशा) येथे ही दुःखद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतन नुकताच पोहायला शिकला होता. त्याची शाळा सध्या सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत असायची. शाळेतून आल्यानंतर दुपारच्या सुमारास परिसरातील आठ […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
अहिल्यानगर महाराष्ट्र

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

शिर्डी : शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे‌. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी […]

Relief to Ajit Pawar clean chit from election officials
अहिल्यानगर महाराष्ट्र

कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी, २५ कोटी रुपयांचा निधी देणार

शिर्डी : कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी दिली असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज कोपरगाव येथे केली. कोपरगाव येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर या इमारतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज अजित पवार […]

Sanjay Bansode reviews the problems of villages in Kopargaon taluka on Maharashtra Samrudhi Highway
अहिल्यानगर महाराष्ट्र

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा

अहमदनगर : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील गावांमधील रहिवाशांना जाणवणाऱ्या समस्यांचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशांसमवेत […]

Six killed in car-truck accident on Agra-Lucknow road
अहिल्यानगर महाराष्ट्र

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अहमदनगर : बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सागर बबन लष्करे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) व किरण बाबासाहेब ठुबे (रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. बारावीचा पेपर देऊन पारनेर […]