संगमनेर तालुक्यातील सांगवी गावात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेत सात वर्षांपासून फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी व त्याचा पाठलाग करणारा पोलीस कर्मचारी अंधारामुळे विहिरीत पडले. घटनेचे सविस्तर वृत्त: २०१६ साली जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणात आरोपीने आपल्या मामा आणि मामीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीने आरोपी […]
अहिल्यानगर
Stay updated with the latest news and developments from अहिल्यानगर (Ahilyanagar) and the surrounding Malwa region. From local events and political updates to cultural stories and community happenings, this section brings you everything you need to know about life in this historic and vibrant region.
कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी, लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयतेने हत्या केली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींना फाशी दिली जावी, या मागणीसाठी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलनं झाली होती. अखेर न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता या घटनेला आठ […]
…अन्यथा बाळासाहेब थोरातांच ‘ते’ स्वप्न आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं – राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर : विधानसभेत यश मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना अनेक विषयांवर प्रतिक्रीया दिल्या. ते म्हणाले कि, “माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं […]
नवविवाहित दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरु
अहमदनगर : लग्नाला अवघे काही महिने झालेल्या नवदाम्पत्याचे मृतदेह आढळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या जोडप्याचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ही दुर्दैवी घटना […]
कौतुकास्पद! ताईबाईच्या मातृत्वाला जाग, नेसलेली साडी सोडून वाचवले दोघांचे प्राण
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा ताईबाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे. जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईंचं सर्वत्र कौतुक होत आहे. दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधात पावसामुळे धरण ८०% टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी […]
जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं विधान; म्हणाले, फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा २५ वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील वर्धापन दिनाच्या […]
दुःखद घटना – प्रवरा नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरू असताना एसडीआरएफचे जवान बुडाले, तीन जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु…
संगमनेर – बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय – २५ रा. धुळवड […]
शिर्डी – आळंदी पालखीला अपघात, कंटेनर भरधाव वेगात पालखीत घुसल्याने चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी
शिर्डी : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला. पालखी आळंदीकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा भयंकर अपघात झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी […]
अखेर तिढा सुटला! औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशानंतर प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवले होते. याबाबत प्रमोद बोंद्रे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला असून, प्रमोद बोंद्रे यांचे सरपंचपद कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिबलापुर ग्रामपंचायतीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता होती. ठरल्याप्रमाणे अडीच […]
पुणे : ओतूर परिसरात भीषण अपघात, दोन महिलांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
पुणे : जुन्नर तालुका हद्दीत नगर – कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरातील कोळमाथा या ठिकाणी पिकअपने एकाच वेळी एका पायी जाणाऱ्या युवतीला आणि दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला धडक दिली. या अपघातात दोनही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]










