आधार कार्ड वापरकर्ते आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी कोणत्याही कायम नोंदणी केंद्रावर जाऊन हे करू शकतात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मते, आधारकार्ड धारकास यासाठी आधार कार्डसह उपस्थित रहावे लागेल. आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करण्यासाठी सोबत फोटो नेणे आवश्यक नाही. कारण तेथील वेब कॅमेर्याचा वापर करून तिथेच फोटो क्लिक करता येतो. आधारमध्ये माहिती अपडेट […]
काम-धंदा
Explore the latest job opportunities, government recruitment updates, and career news from Maharashtra and across India. Our Jobs section provides details on openings, exam notifications, and tips to help you stay ahead in your job search.
सेन्सेक्सने आज गाठली विक्रमी पातळी, गुंतवणूकदारांची मालमत्ता एक लाख कोटींनी वाढली
मुंबई : सेन्सेक्सने आज विक्रमी पातळी गाठली आहे. आज सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि पहिल्यांदाच ५२००० अंकांच्या पातळीवर गेला आहे. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढली आहे. आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, ऑटो या शेअरला चांगली मागणी आहे. सेन्सेक्सने सकाळी ९.३० वाजता ५२०४०.०० अंकांची विक्रमी पातळी […]
मस्तच ! आता विमा पॉलिसी डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येणार.. जाणून घ्या..
नवी दिल्ली : आपल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे सुरक्षित करण्यासाठी लवकरच आपण सरकारी डिजीलॉकर वापर करू शकणार आहोत. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने निर्देश दिले आहेत कि, विमा कंपन्यांनी रिटेल पॉलिसीधारकांना डिजीलॉकर सुविधेविषयी तसेच ते कसे वापरावे याबद्दल सांगावे. विमा कंपनीने पॉलिसीधारकांना त्या प्रक्रियेबद्दलही माहिती द्यावी, ज्याद्वारे पॉलिसीधारक आपली पॉलिसी डिजीलॉकरमध्ये ठेवू शकतात. डिजीलॉकरमध्ये […]
कार लोन घेताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि करा पैशांची मोठी बचत
कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल. तज्ज्ञांचे मत […]
RBI ने घेतला मोठा निर्णय, HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी
RBI ने HDFC बँकेवर नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती. यानंतर आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 30 (1) B अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतला […]
Budget २०२१ : देशात तीन वर्षांत 7 मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील, जाणून घ्या याविषयी..
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की देशातील कापड उद्योगाच्या निर्मितीस व निर्यातीला गती देण्यासाठी 7 मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील. जेणेकरुन भारत या क्षेत्रात निर्यात करणारा देश होईल. हे पार्क तीन वर्षांत बनवले जातील. वस्त्रोद्योग मंत्रालयाने सात मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि ऍप्रल (mega integrated textile region and apparel -MITRA) पार्क सुरू करण्याचा […]
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘या’ विद्यापीठाला स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता
मुंबई : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने SNDT महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय […]
महत्वाची बातमी : महापोर्टलऐवजी आता ‘या’ चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार भरती प्रक्रिया
राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील 5297 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. परंतु राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करुन चार कंपन्यांची निवड केली आहे. निवडण्यात आलेल्या […]
SBI चे डेबिट कार्ड वापरणार्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी
आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने ट्वीट करून आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की जर त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारात अडचणी येत असतील तर त्यांचे पॅनकार्डसंबंधित तपशील त्वरित बँक खात्यात अपडेट करावे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, “आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये त्रास होत […]
मोठी संधी : युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं लष्करात महिलांची भरती, असा करा अर्ज..
पुणे: महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि […]










