महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल आज (२९ जुलै २०२०) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात दहावीचा निकाल ९५.३०% एवढा लागला आहे. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. ९६ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या तर ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागानुसार निकाल कोकण – ९८.७७ टक्के […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून सुरु आहे – शरद पवार
कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवलं. त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. मात्र ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपाकडून केला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. CNN News 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप […]
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे […]
वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे-राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वीजबिलात तात्काळ सूट देण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले, कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा ह्या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच ह्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.” […]
उद्या बुधवार २९ जुलै २०२० रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल
उद्या बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली. या वेबसाईटवर निकाल पाहता येईल www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org अशा प्रकारे बघा निकाल: निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक […]
सुशांतने अभिनेत्रीसोबत सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही, स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मध्यंतरी सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र याप्रकरणी संजनानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीनेदेखील मौन सोडलं आहे. ‘सुशांतने सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही’, असं तिने ‘पिंकव्हिला’सोबत बोलताना सांगितलं आहे. “सेटवर असताना सुशांतने संजनासोबत कधीच गैरवर्तन केलं नाही. […]
राजकीय डावपेचांमुळे एकदिवस लोकशाहीच धोक्यात येईल-अभिनेते प्रकाश राज
राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच आता बहुजन समाज पक्षानं थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली आहे व विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. यासंदर्भात बसपानं आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडिंवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. या राजकीय डावपेचांमुळे आणि सत्तेच्या […]
भाजपाकडूनच बॅन केलेल्या CamScanner या चिनी अॅपचा वापर
चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर या तणावाच्या वातावरणातच भारतानं ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकद चिनी अॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि याला कारणही भाजपाच ठरली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचं पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आलं. मात्र हे पत्र CamScanner […]
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण
अमेरिकेत कोरोनाचं थैमान असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला करोनाची लागण झाली आहे. सीएनएनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त दिलं. पहिल्यांदाच ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ’ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट नाही. १० जुलैला […]
इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्याचे काम सुरु
कोलकाता शहरातली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर […]









