भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले, कि भारत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआयने मागितली एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे. एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र […]
कोरोना केव्हा संपेल? WHO चे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं…
जगात सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण वाट बघत आहेत ती कोरोना लसीची. भारतातही करोनावर लस शोधण्यात आली असून, तिच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं की, “करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला अपेक्षा आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत सर्व देश कोरोना […]
केंद्र सरकारकडून ४४ ट्रेनचं कंत्राट रद्द, चीनला मोठा झटका
केंद्र सरकारकडून सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. यामुळे केंद्र सरकारने चिनी कंपनीला जोरदार झटका दिला आहे. एकूण ४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी असणाऱ्या स्पर्धकांमध्ये चिनी कंपनी भागीदार होती, यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय चीनसाठी मोठा झटका आहे. चीनमधील CRRC Yongji Electric […]
दिल्लीच्या धौला कुआ भागातून ISIS शी संबंधित असलेल्या दहशतवाद्याला अटक
राजधानी दिल्लीत आज पोलिसांनी एका आयसीसच्या दशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामानही जप्त करण्यात आलंय. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या धौला कुआ भागातून ISIS शी संबंधित असलेल्या या दहशतवाद्याला अटक करण्यात आलीय. पोलिसांमध्ये आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार झाल्याचीही माहिती येतेय. या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवायसेज (IEDs) आढळल्याची माहिती डीसीपी प्रमोश सिंह कुशवाहा […]
कोरोनावरील लसीचे पहिले ५० लाख डोस सैन्याला देण्याचा सरकारचा विचार
भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची […]
सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआय करणार मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI) मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी करणार आहे. डीसीपी त्रिमुखे रिया चक्रवर्ती हिच्या सतत संपर्कात होते, या वृत्तातले तथ्य तपासणे आणि अन्य काही मुद्यांची माहिती घेण्यासाठी सीबीआय डीसीपी त्रिमुखेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. तपासात सहभागी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात […]
दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं अस्लम खान यांचं कोरोनामुळे निधन
बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं अस्लम खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (९० वर्ष) आणि अस्लम खान(८८ वर्ष) या दोन्ही भावांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अस्लम खान […]
पाकिस्तानकडून भारताला अणुहल्ल्याची धमकी
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी देत पाकिस्तानकडे असलेल्या अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत असल्याचं म्हटलं. तसंच या अणुहल्ल्याने मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नसल्याचंही ते म्हणाले. पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर पारंपरिक युद्ध होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं […]
राज्याचा कारभार कसा करावा हे शिकवू नये; ‘वर्षा’वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय: रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर यांनी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. दरम्यान भाजपने केलेल्या या टीकेला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, “मुन्ना यादव सारख्या […]










