shekhar gawali
क्रीडा

दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला आहे. रेस्क्यू टीमला आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरीत त्यांचा मृतदेह आढळला. शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते थेट दरीत कोसळले. मंगळवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. गवळी यांच्या […]

abhijeet kelkar purnima dey
कोरोना मनोरंजन

‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक असलेले अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिजीत केळकरने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धकही होता. सध्या तो ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. सिंगिंग स्टार’ […]

congress rahul gandhi
देश राजकारण

नोकऱ्या द्या, पोकळ घोषणा नकोत- राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे भारताचे भविष्य धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, मोदी सरकार भारताचे भविष्य धोक्यात घालत आहे.  तसेच सरकार अहंकारामुळे अस्सल चिंतांकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे ते जेईई-नीटसाठी […]

railway started
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूकीला परवानगी

लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे. पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी […]

congress sachin sawant
महाराष्ट्र राजकारण

कंगनाजी, तुम्ही ज्यांचे आभार मानले, त्यांच्यापासूनच घाबरून राहायला हवं- सचिन सावंत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौत नेहमी बोलत असते. दरम्यान, भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगना रणौतनं दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र […]

cow milk rate
महाराष्ट्र शेती

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची गरज

दूध व्यवसाय करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यात शेतकऱ्यांना खूप खर्च देखील करावा लागतो. पशूंचा चारा, त्यांचे लसीकरण, त्यांच्या आरोग्यविषयक गरजा, त्यांना लागणारी पेंड या सगळ्याचे व्यवस्थापन केल्यानंतर दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय […]

इतर

शिवनेरी किल्ला – महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच हे जन्मस्थान

शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे आहे. जुन्नरमध्ये प्रवेश करतानाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर हा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी […]

Unlock 4 guidelines
देश महाराष्ट्र

अनलॉक ४ नियमावली (Unlock 4 guidelines) जाहीर, बघा काय सुरू आणि काय बंद

Unlock 4 Guidelines / अनलॉक ४ नियमावली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ४ साठीची नवी नियमावली जाहीर केली आहे. १ सप्टेंबरपासून ही नवी मार्गदर्शक तत्वे लागू होणार आहेत. ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राची परवानगी २१ सप्टेंबरपासून खुल्या […]

sushant singh rajput
मनोरंजन

धक्कादायक खुलासा: सुशांतच्या गळ्याभोवती व तळपायांवर सुईच्या खुणा, गळ्याभोवती चिकटपट्टी आणि पाय तुटलेले..

सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने हा व्हिडीओ ट्विटर वर शेयर केला आहे. यात हॉस्पिटल मधील कर्मचारी आहे, जो सुशांतच्या निधनानंतर त्याच्या पोस्टमार्टम पासून अंत्यविधीपर्यंत तिथे उपस्थित होता. त्याने असा दावा केला आहे कि, सुशांतला ठार मारण्यात आले आहे आणि हॉस्पिटल मधील डॉक्टर देखील हेच म्हणत […]

mumbai dabbavala
मुंबई

लॉकडाऊन मुळे लोकल बंद, डबेवाल्यांना रोजगार नाही

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका व्यापारी, सर्वसामान्य यांच्यासह डबेवाल्यांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने […]