housing minister Jitendra Awhad
मुंबई

म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी भेट

मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. […]

sushant singh rajput
मनोरंजन

एनसीबीचा सुशांतसिंह राजपूतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने तपासास सुरुवात केली. एनसीबी ने या प्रकरणात अनेक जणांना ताब्यात देखील घेतले आहे. एनसीबीच्या पथकाने सुशांतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा टाकला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधं, अॅश- ट्रे […]

Kangana ranaut Jaya Bachchan
मनोरंजन

आमच्याबद्दलही थोडी दया दाखवा, कंगनाने जया बच्चन यांना दिलं प्रत्युत्तर

आज सकाळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत नाव न घेता कंगना रनौतला लक्ष्य केले. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या बदनामीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं, असं जया बच्चन म्हणाल्या. जया […]

11th admission
शैक्षणिक

मराठा आरक्षण कायद्याच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या (मंगळवार) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार […]

Lok Sabha MPs
कोरोना देश

लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालीय. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनात या सर्व खासदारांची १३ आणि १४ सप्टेंबर रोजी करोना चाचणी करण्यात आली होती. करोना संक्रमित खासदारांमध्ये सर्वाधिक १२ खासदार सत्ताधारी भाजपचे, वायआरएस काँग्रेसचे दोन, शिवसेना, डीएमके आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका-एका खासदाराचा समावेश आहे. अधिवेशनाच्या […]

Dominic Thiem
क्रीडा

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने मिळवले अमेरिकन ओपन स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम विजेते पद

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम पदक मिळवले आहे. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळाला आहे. अलेक्झांडरने थिमविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये […]

raj uddhav thakrey
महाराष्ट्र

राज ठाकरे यांनी वैद्यकीय सेवेविषयी संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्र्यांना लिहिलं जबाबदारीची आठवण करून देणारं पत्र

राज्यातील कोरोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणाबाहेर आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २३ ते २५ हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेवरती ताण वाढत आहे. सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू होत असून, त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याच्या संरक्षणावरून आता नवा मुद्दा पुढे आला आहे. यावरून खासगी सेवेतील डॉक्टरांचं […]

Restrictions on foreign journalists
ग्लोबल

परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियात निर्बंध

ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलिस विभाग व परराष्ट्र विभाग हे आता सरकारच्या इतर विभागांशी सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. जर येथे काही परदेशी पत्रकार चुकीच्या पक्षपाती बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणारे परदेशी […]

Corona Vaccine
कोरोना देश

कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर […]