Need to discuss basic issues of agricultural law - Prime Minister Narendra Modi
देश

कृषी कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : सोमवारी, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे. कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या […]

CBSE Board Exam Form 2021: Another opportunity to fill up and correct the exam form
शैक्षणिक

CBSE Board Exam Form २०२१ : बोर्डाने दिली परीक्षा फॉर्म भरण्याची तसेच दुरुस्तीची आणखी एक संधी

CBSE Board Exam Form २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्रासाठी २०२०-२१ घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 संदर्भात शनिवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी यासंबंधी सूचना जारी करण्यात आली. जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, माध्यमिक व उच्य माध्यमिक वर्गातील असे सर्व विद्यार्थी जे […]

uttarakhand Glacier Burst : Indian Airforce Deployed In Rescue
देश

उत्तराखंड हिमनदी दुर्घटना : जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला, हेलिकॉप्टरमधून पुरवणार अन्न-धान्याची पाकिटं

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडून मदत पुरवण्यात येत आहे. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात […]

Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. बॉसवर हल्ला करणाऱ्या गिरणी कामगाराला कारवाईपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने ही टिप्पणी केली. रंगराव चौधरी नावाच्या व्यक्तीने कामगार न्यायालयाच्या मे 1995 मधील आदेशाला आव्हान दिले होते. त्याची याचिका न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या […]

Now the Uttarakhand tragedy does not endanger the surrounding villages
देश

मोठी बातमी : आता उत्तराखंड दुर्घटनेत आसपासच्या गावांना धोका देत नाही, पाणीपातळी होतेय कमी

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्याने प्रचंड विनाश झाला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची माहिती आहे. तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे. केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये नेव्ही गोताखोरांनाही बचावासाठी पाठवले आहे. जेणेकरून ते नदीत चांगल्या प्रकारे मदतकार्य करू शकतील. तसेच आतापर्यंत एनडीआरएफच्या 5 टीम उत्तराखंड येथे पाठविण्यात […]

Four killed in Pune-Bangalore National Highway accident
महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागांव गावच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एम.एच. 07 ए.बी. 5610) ही […]

amit shah slams shivsena and mahavikas aghadi
महाराष्ट्र राजकारण

मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. काय म्हणाले अमित शाह? “सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. […]

Veteran tennis player and former Davis Cup coach Akhtar Ali dies
क्रीडा

दिग्गज टेनिसपटू आणि डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक अख्तर अली यांचे निधन

नवी दिल्ली : दिग्गज टेनिसपटू आणि डेव्हिस कपचे माजी प्रशिक्षक अख्तर अली यांचे आज (७ फेब्रुवारी) कोलकाता येथे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. भारताचे सध्याचे डेव्हिस चषक प्रशिक्षक झीशान अली यांचे वडील अख्तर यांनी रमेश कृष्णन, विजय अमृतराज, आनंद अमृतराज आणि लिअँडर पेस या खेळाडूंना प्रशिक्षण दिले. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने अखिल अख्तर अली […]

Farmers protest: Another farmer commits suicide by writing a suicide note
देश

शेतकरी आंदोलन : आणखी एका शेतकऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्यानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या टिकरी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर सिंह असल्याचं समजतंय. त्यांचं वय ५० च्या आसपास असून ते जिंदच्या सिंहवाला गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर सिंह गेल्या […]

avalanche in Tapovan area of Uttarakhand
देश

उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्यामुळे अनेकजण बेपत्ता, हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावाजवळ असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळलाआहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यामुळे हरिद्वारपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा […]