CBSE Board Exam Form २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्रासाठी २०२०-२१ घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेशन विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 संदर्भात शनिवारी 6 फेब्रुवारी 2021 रोजी यासंबंधी सूचना जारी करण्यात आली.
जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, माध्यमिक व उच्य माध्यमिक वर्गातील असे सर्व विद्यार्थी जे काही कारणास्तव CBSE बोर्ड दहावी किंवा 12 वी परीक्षा २०२१ फॉर्म भरू शकले नाहीत, ते आता 13 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेचे फॉर्म भरू शकतील. त्यासोबतच, मंडळाने शाळांना देखील 13 फेब्रुवारीपर्यंत राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी एलओसी सबमिट करण्याची आणखी एक संधी दिली आहे. याशिवाय मंडळाकडून नव्याने संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली आहे.
उर्वरित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याच्या संधीबरोबरच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्म भरण्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आलेल्या असतील किंवा ज्यांना परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असेल, त्यांना मंडळाने आणखी एक संधी दिली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फॉर्म 2021 मध्ये दुरुस्ती, तसेच शाळांनी आधीच भरलेल्या एलओसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी निश्चित केली आहे.
CBSE बोर्डाने नोटीस जारी करून, दिलेल्या नवीन तारखेपर्यंत शाळांना परीक्षा फॉर्म भरण्याचे व आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत, कारण यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. फॉर्म भरणे आणि दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीबीएसई बोर्ड प्रवेश पत्र 2021 लवकरच दिले जाऊ शकते.