Ravi Shastri tests positive
क्रीडा

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण

IND vs ENG : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याअगोदर, रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे, त्यानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत […]

A lookout notice has been issued against Anil Deshmukh
महाराष्ट्र

अनिल देशमुखांविरुद्ध ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी, देशमुखांना लवकरच शोधून काढणार

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी […]

Nipah Virus Found
देश

केरळमध्ये निपाह विषाणूमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, NCDC ची टीम केरळकडे रवाना

केरळ : केरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी सकाळी निपाह विषाणूमुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाचे सर्व नातेवाईक आणि त्याच्या उपचाराशी संबंधित सर्व लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. केंद्राने केरळमध्ये एक टीमही पाठवली आहे. #HealthForAll ➡️ A case of Nipah Virus detected in Kozhikode district of Kerala […]

earthquake in many parts of northern india including delhi
कोल्हापूर महाराष्ट्र

भूकंपाच्या धक्क्याने हादरले कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. कोल्हापूरपासून १९ किलोमीटर पश्चिमेकडे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Earthquake of Magnitude:3.9, Occurred on 04-09-2021, 23:49:28 IST, Lat: 16.74 […]

What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी

मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच, राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी […]

health benefits of pomegranate peel
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

डाळिंबाच्या साली आहेत खूपच गुणकारी, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

डाळिंब त्याची विशिष्ट चव आणि त्याच्या आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायद्यांसाठी ओळखले जातात. आपण नेहमीच डाळिंबाच्या बिया फार आवडीने खातो, त्याचे अनेक फायदे आहेत. परंतु डाळिंबाची लाल रंगाची कडक त्वचा अनेकदा टाकून दिली जाते. मात्र, डाळिंबाच्या बियांप्रमाणे त्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहे, हे आपल्याला माहित नसते. डाळिंबाच्या सालीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत, ते आपण जाणून घेऊया: […]

girl flushed newborn in toilet
देश

बलात्कार पीडितेने नवजात भ्रुणाला टॉयलेटच्या कमोडमध्ये फ्लश केले…

कोचीन : केरळच्या कोचीन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने वेळेआधीच जन्माला आलेल्या आपल्या नवजात भ्रुणाला टॉयलेटच्या कमोडमध्ये फ्लश केले. एका २० वर्षांच्या तरुणाने या अल्पवयीन पीडितेवर कथितरित्या बलात्कार केल्यानंतर ती गर्भवती राहिली होती. वायनाड जिल्ह्यातून पोलिसांनी आरोपीला गेल्या गुरुवारी अटक केली. वायनाडहून पोलिसांनी आरोपीला कोचीनला आणलं असून […]

one died, five injured in a fire that broke out due to an explosion at Jakharia Fabric Ltd in Boisar
महाराष्ट्र

पालघरमधील बोईसरयेथील जखारिया फॅब्रिक लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट

पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीत शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. कारखान्यातील बॉयलरचा भीषण स्फोट झाल्यामुळे कापड निर्मिती करणाऱ्या या कारखान्यात भीषण आग लागली. या स्फोटाचा […]

Minister Eknath Shinde
पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी! पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील ‘या’ तारखेपर्यंतची गुंठेवारीची प्रकरणे नियमित होणार

मुंबई, दि. ३ – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरातील विविध […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
पुणे महाराष्ट्र

…अन्यथा दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन […]