Nipah Virus Found

केरळमध्ये निपाह विषाणूमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, NCDC ची टीम केरळकडे रवाना

देश

केरळ : केरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी सकाळी निपाह विषाणूमुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाचे सर्व नातेवाईक आणि त्याच्या उपचाराशी संबंधित सर्व लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. केंद्राने केरळमध्ये एक टीमही पाठवली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूचा एक रुग्ण आढळला होता. हा मुलगा 12 वर्षांचा होता, त्याची संशयित केस 3 सप्टेंबर, 2021 रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात नोंदवली गेली. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज सकाळी त्याचे निधन झाले. केंद्र सरकारने NCDC ची एक टीम केरळकडे रवाना केली आहे. ही टीम राज्याला तांत्रिक सहाय्य करेल. 2018 मध्ये देखील केरळच्या कोझीकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात निपाहचा उद्रेक झाला होता.

प्रसार कसा होतो?

  1. वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यास
  2. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास
  3. एनआयव्हीचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातून
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत