guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021
महाराष्ट्र

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ साठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास होणार

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 येथे सुमारे 50 हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजित संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

8 सप्टेंबर 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई : महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मंजूरी […]

A long term plan will be prepared for the Warkari
महाराष्ट्र मुंबई

वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात येणार

मुंबई : ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले- शाहू- आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते, तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद […]

Russian Emergency Minister Zinichev dies while saving a person's life during drills
ग्लोबल

रशियन मंत्र्याचे एका कॅमेरामनचे प्राण वाचवताना दुःखद निधन

रशिया : रशियाचे आपत्कालीन मंत्री (emergencies minister) येवगेनी झिनिचेव यांचे यांचे एका व्यक्तीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताना निधन झाले आहे. आर्क्टिक शहर नॉर्लिस्क येथे लष्करी कवायतीदरम्यान अधिकृत कर्तव्य बजावत असताना ही दुःखद घटना घडली. रशियाचे आपत्कालीन मंत्री जिनिचेव एका कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हा कॅमेरामन घसरून पाण्यात पडला होता. त्याला वाचवताना हा अपघात झाला. […]

Agreement between Mumbai Municipal Corporation and Cambridge to start an International Board course
महाराष्ट्र मुंबई

मुंबई पब्लिक स्कुलमध्ये सुरु होणार आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम, केंब्रिज विद्यापीठाशी सहमतीचा करार

मुंबई : देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला […]

Link Pan Card With Aadhar Card Online
अर्थकारण देश

30 सप्टेंबरपर्यंत पॅन-आधार लिंक करा, अन्यथा भरावा लागेल 10 हजारांचा दंड

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन आधारशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत आधार-पॅन लिंक करावे लागणार आहे. आधार-पॅन लिंक आहे की नाही हे […]

Selmon Bhoi: Court Blocks Mobile Game Based on Salman Khan's Hit and Run Case
गॅझेट्स

सलमान खानच्या हिट अँड रन केसवर आधारित ‘त्या’ गेमवर बंदी, न्यायालयाने दिले हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसवर आधारित गेम ‘सेलमॉन भोई’ (Selmon Bhoi) वर मुंबई दिवाणी न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायाधीश के. एम. जायस्वाल यांनी हा गेम बनवणारी कंपनी पॅरोडी स्टूडिओज प्रायव्हेट लिमिटेडला गेम आणि कोर्ट संबंधित कोणत्याही कंटेट किंवा प्रसार, त्याला लाँच करणे किंवा रिलाँच करणे किंवा रि प्रोड्युस करण्यावर बंदी […]

Phd, Master's Degrees Not Valuable Say Taliban Education Minister
ग्लोबल

तालिबानने केला शिक्षण क्षेत्रात बदल, सरकारमधील कोणाकडेही पदवी नाही त्यामुळे पदवीचे काही महत्त्व नाही

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारची घोषणा केली आहे, मंगळवारी संंध्याकाळी तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर शरियत लागू झाल्याची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातही बदल करण्यास सुरूवात केली आहे. आता तालिबानच्या शिक्षण मंत्र्याने शेख मौलवी नूरल्लाह मुनीर याने म्हटले आहे की सध्याच्या काळात पीएचडी, पदव्युत्तर पदवीचे काही महत्त्व नाही. तालिबानने सत्ता […]