मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
माथेफिरूने वीर्याने भरलेली सिरिंज महिलेला टोचली, आणि…
अमेरिका : अमेरिकेतील एका व्यक्तीला ‘वीर्य हल्ल्या’साठी (Semen Attack) 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. पुरुषाने एका महिलेवर त्याच्या वीर्याने भरलेल्या सिरिंजने हल्ला केला होता. किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या शरीरात त्याने वीर्याने भरलेली सिरिंज टोचली होती. द सन न्यूजच्या वृत्तानुसार, केटी पीटर्स नावाची महिला मेरीलँडमधील एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. या दरम्यान, […]
शरद पवार म्हणाले, काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी, पण…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी काँग्रेसची स्थिती आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) सरकारचे […]
खळबळ! आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्याची टॉवेलने गळा दाबून हत्या
उत्तर प्रदेश : बागपतचे भाजप नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. टॉवेलने तोमर यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडौतच्या बिजरौल रोडवर […]
महिला कॉन्स्टेबलने केली पुरुष कॉन्स्टेबलची हत्या, तब्बल एक महिन्यानंतर समोर आलं सत्य…
मुंबई : एका पुरुष कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी एक महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या दोन साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय शिवाजी माधव सानप हे दररोज पनवेल स्टेशनवरून जात असत. पनवेलहून ट्रेनने […]
मोठी बातमी! स्पेस स्टेशनवर धुर दिसल्याने खळबळ, अंतराळ स्टेशन आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची वाढली चिंता
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (International Space Station) धुराचा अलार्म वाजल्याने अंतराळ स्टेशन आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. ही घटना गुरुवारी घडली. जेव्हा स्पेस स्टेशनच्या रशियन मॉड्यूलमध्ये प्लास्टिक जळल्यासारखा वास आला. तेथे उपस्थित असलेल्या काही अंतराळवीरांना हा वास आला. यानंतर संपूर्ण अंतराळ स्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी रशियन मॉड्यूलमध्येच क्रॅक आल्याची बातमी आली होती. […]
सरकार विकत आहे BPCL मधील संपूर्ण हिस्सा, आता LPG सबसिडीचं काय होणार? जाणून घ्या…
नवी दिल्ली : भारत सरकार बीपीसीएलमधील संपूर्ण हिस्सा विकत आहे. यानंतर कंपनी खाजगी होईल. आता ग्राहक एलपीजीच्या सबसिडीबद्दल चिंतित आहेत. कारण सबसिडी सरकारकडून दिली जाते आणि बीपीसीएल आपल्या पद्धतीने एलपीजीच्या किंमती निश्चित करेल. तथापि, सरकारने यातून मार्ग शोधला असून ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही. भारत सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या एलपीजी ग्राहकांना […]
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, अंजली दमानिया वरच्या कोर्टात दाद मागणार
मुंबई : महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. […]
अनिल देशमुख यांची ईडीविरोधात याचिका, समन्स रद्द करण्याची मागणी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र या याचिकेच्या वैधतेवरच केंद्र सरकारनं जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या याचिकेची सुनावणी खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्र सरकारतर्फे सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केली. ते म्हणाले की याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, […]
पुण्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार, पोलिस आयुक्तांनी जारी केले आदेश
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यातच आता पुण्यातही उद्यापासून जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर ते […]










