T-Series : भारतीय म्युजिक कंपनी T-Series ने एक नवीन यश संपादन केले आहे. T-Series चे YouTube चॅनल जगातील सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेला चॅनल बनला आहे. YouTube वर 200 दशलक्ष किंवा 200 दशलक्षाहून अधिक सदस्य असलेला हा जगातील एकमेव आणि पहिला चॅनेल बनला आहे. भूषण कुमार यांचा T-Series हा संगीत जगतात एक प्रसिद्ध ब्रँड आहे. आता त्याने […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुण्यात तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, समोर आली धक्कादायक माहिती
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून जवळच ही घटना घडली. समीर मनूर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. […]
भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी, आर्मी टीजीसी १३५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू
भारतीय सैन्य दलाच्या टेक्निकल कोअर मध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याद्वारे जुलै २०२२ पासून सुरू होणाऱ्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC 135) साठी सोमवार, ६ डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सैन्यातर्फे आर्मी टीजीसी १३५ साठी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ […]
पुण्यात खळबळ! काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
पुणे : पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौक येथे घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समीर मनूर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना […]
2 आणि 4 महिन्यांच्या बाळाला चुकून दिली कोरोनाची लस, दोन्ही बालकांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
ब्राझीलमध्ये चुकून दोन नवजात बालकांना कोरोनाची लस दिल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही बालकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 महिन्यांची मुलगी आणि 4 महिन्यांच्या मुलाला डिप्थीरिया, टिटॅनस, डांग्या खोकला आणि हिपॅटायटीस बी विरुद्ध लसीकरण करण्यासाठी आणले असता त्यांना Pfizer लस देण्यात आली. या मुलांना कोरोनाची लस देणाऱ्या नर्सला निलंबित करण्यात […]
राष्ट्रपती राम नाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीवर
मुंबई : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार […]
नागालँड गोळीबार प्रकरणाचे संसदेत पडसाद, अमित शहा देणार स्पष्टीकरण
नवी दिल्ली : नागालँडच्या मोन जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरक्षा दलाच्या जवानांनी एका माहितीच्या आधारे दहशतवादी समजून एका वाहनावर गोळीबार केला. पण या वाहनात दहशतवादी नव्हते, तर कोळसा खाणीत काम करणारे मजूर असल्याचं गोळीबारानंतर लक्षात आलं. या गोळीबारात १३ मजूर ठार झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलांची वाहनं पेटवून दिली. या घटनेत १ जवान ठार झाला. […]
एटीएममधून पैसे काढणे आता महागणार, 1 जानेवारी 2022 पासून नियम होणार लागू
मुंबई : एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. आयसीआयसीआय बँक 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवणार आहे. त्यामुळे आता 20 रुपयांऐवजी प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये कापले जातील. या वर्षी जूनमध्ये, आरबीआयने बँकांना एटीएमद्वारे निश्चित मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून […]
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. भारतातील टीव्ही पत्रकारितेतील अग्रगण्य नाव असलेले विनोद दुआ यांनी बराच काळ पत्रकारितेच्या कारकिर्दीत दूरदर्शन आणि NDTV […]









