तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, सीडीएस जनरल रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची हवाईदलाची माहिती
तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघातातून आतापर्यंत तीन जनांना वाचवण्यात यश आले आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. […]
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरी उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात आलेली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत EWS, NCL आणि CVC/TVC मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची, माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबत विद्यार्थी व पालक यांची मागणी, कोविड साथीच्या […]
जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादूटोणा विरोधी कायदा’ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नरबळी आणि इतर अमानुष, […]
राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार, ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी
मुंबई : दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते. या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या […]
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षांसाठी तडीपार
सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत. सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना राजेश […]
सुसज्ज वाहनांच्या मदतीने गुन्हेगारी रोखावी – पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना आधुनिक सुसज्ज वाहने उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या घरांचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन निधीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने देण्यात आली. त्यांचा […]
कृषी विभागाची कृषी मॉल संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली : सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेंद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभागाची कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच ठरेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. वाळवा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तालुका बीजगुणन केंद्र इस्लामपुर […]
हिवाळ्यात ‘अशाप्रकारे’ करा हळदीचे सेवन, मिळतील अनेक फायदे…
हिवाळ्याचा ऋतू एकीकडे उष्णतेपासून दिलासा देत असला तरी त्याच्याबरोबर अनेक ऋतूजन्य आजारही येतात. परंतु या आजारांपासून दूर राहण्याचे घरगुती उपाय माहिती असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हळद हा प्रत्येक भारतीय घराघरात उपस्थित असलेल्या सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. हळदीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात. यामुळे आपल्या चयापचयला गती मिळते. शिवाय आपल्या कॅलरीही जलद गतीने कमी होतात. औषधी […]
नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध
अहमदनगर : नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी काही निर्बंध लावले आहेत. त्यानुसार खातेदारांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याशिवाय इतरही बंधने लादण्यात आली आहेत. गेल्याच आठवड्यात बँकेची निवडणूक झाली. प्रदीर्घ प्रशासकीय राजवट संपवून दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या गटाने पुन्हा सत्ता मिळविली आहे. त्यातच आता नव्याने आलेल्या संचालक […]










