Deputy Mayor of Solapur Rajesh Kale Tadipar for two years
महाराष्ट्र सोलापूर

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना राजेश काळे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्या प्रकरणी राजेश काळे यांना पोलिसांनी अटकसुद्धा केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आज बुधवारी पहाटे पाच वाजता उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत