सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दुःखद! अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचं निधन
मुंबई : अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचं निधन झालं आहे. सायलीने स्वतः च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला सायलीच्या वडिलांचे निधन झाले. सायलीने सोशल मीडियावर वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. यासोबतच तिने लिहिले की, ‘संजीव २६/७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहीत आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात […]
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात
नाशिक : कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. […]
Viral Video : लहान मुलाला बसवला कृत्रिम हात, त्याच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेने भारावले नेटिझन्स
तुम्हाला मनापासून हवी असलेली एखादी गोष्ट मिळते, तेव्हा तुम्हाला कसे वाटते? तो आनंद शब्दांत सांगता येत नाही, बरोबर ना? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला त्याचा कृत्रिम हात बसवण्यात आला. त्यानंतर त्याच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियेतून त्याला झालेला आनंद दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक लहान मुलगा व्हीलचेअरवर […]
अनिलकुमार गायकवाड यांची एम एस आर डी सी च्या सह- व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केला आहे. अनिलकुमार गायकवाड हे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग […]
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राज्यात विशेष मोहीम, धनंजय मुंडे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेले दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र (UDID Card) मिळवून देण्यासाठी राज्यभरात 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी हा निर्णय […]
राज्य सरकारकडून हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध, ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई : दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना ‘चिंतेची बाब’ (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. यासंदर्भात नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत अ -भारत सरकारने वेळोवेळी लादलेले निर्बंध […]
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचे आदेश
नागपूर : कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य […]
‘मिर्झापूर’मधील अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला, चाहत्यांना मोठा धक्का
मुंबई : ‘मिर्झापूर-2’ वेबसिरीजमध्ये ललितची भूमिका साकारणारा ब्रह्म मिश्रा याचे त्याच्या अंधेरीतील राहत्या घरात निधन झाले आहे. गेल्या चार वर्षापासून तो मुंबईतील अंधेरी येथे भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरला त्याच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे तो डॉक्टरांकडेही गेला होता. डॉक्टरांनी त्याला गॅसेसची […]
मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची निर्माण झालेली ओळख कौतुकास्पद – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक : नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत. नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केले आहे, याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. अलिकडे नाशिकला मैदानी खेळांची राजधानी म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले […]










